Advertisement

बीकेसीतील कौटुंबिक न्यायालयात 'रॅपिड अँटीजेन टेस्ट'

राज्यभरातील सर्व कौटुबिक न्यालायालयं, पक्षकार व वकीलवर्ग यांना प्रत्यक्षात कोर्टात हजर राहून कामकाज चालवण्याची परवानगी आहे. त्यामुळे हा उपक्रम इथं राबवण्यात आला आहे.

बीकेसीतील कौटुंबिक न्यायालयात 'रॅपिड अँटीजेन टेस्ट'
SHARES

बीकेसीतील कौटुंबिक न्यायालय परिसरात कोविड 19 च्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानं 'रॅपिड 'अँटीजेन टेस्ट' सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या चाचण्या घेण्यात येत आहेत.

राज्यभरातील सर्व कौटुबिक न्यालायालयं, पक्षकार आणि वकीलवर्ग यांना प्रत्यक्षात कोर्टात हजर राहून कामकाज चालवण्याची परवानगी आहे. त्यामुळे हा उपक्रम इथं राबवण्यात आला आहे.

उपक्रमाची सुरुवात कौटुंबिक न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश मनोज शर्मा यांनी स्वतःची चाचणी करून केली. या प्रसंगी उपस्थित इतर न्यायाधीश, विवाह समुपदेशक, प्रबंधक, व्यवस्थापक, बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि कर्मचारीवर्ग यांच्यासोबत काही पक्षकारांनीही ही चाचणी करून या उपक्रमाचा लाभ घेतला.

कोविड चाचणीची ही सुविधा न्यायालयाच्या प्रवेशद्वारापाशी दररोज मोफत उपलब्ध राहील. जरी चाचणी करणं बंधनकारक नसले तरी सर्वांनी या उपक्रमाचा लाभ कर्तव्य भावनेनं घ्यावा, असं आवाहन यावेळी मनोज शर्मा यांनी उपस्थितांना केलं.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा