Advertisement

रवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ


रवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ
SHARES

वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी एनडीटीव्हीचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. व्यवस्थापनाने रवीश कुमार यांचा राजीनामाही स्वीकारला आहे. यापूर्वी, प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी एनडीटीव्हीचा प्रवर्तक समूह आरआरपीआरएचच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत दोघांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. 

एनडीटीव्ही समूहाच्या अध्यक्षा सुपर्णा सिंग यांच्या वतीने तेथील कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये लिहिले आहे-

"रवीश यांनी NDTV मधून राजीनामा दिला आहे आणि कंपनीने त्यांच्या राजीनाम्याची विनंती तत्काळ प्रभावाने स्वीकारली आहे."

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणय रॉय हे NDTV चे चेअरपर्सन आणि राधिका रॉय कार्यकारी संचालक आहेत. त्यांच्याकडे नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडचे एक चतुर्थांश शेअर्स आहेत. अदानी समूहाच्या मालकीच्या विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VCPL) कडे RRPR होल्डिंगची 99.5% इक्विटी हस्तांतरित केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये अदानी समूहाने अप्रत्यक्षपणे NDTV मधील 29.1 शेअर्स खरेदी केले. हा करार 'विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VCPL)' आणि 'RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड' मार्फत करण्यात आला होता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा