Advertisement

काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता हरपला, शेलार यांच्या निधनानं राजकीय वर्तुळातून हळहळ


काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता हरपला, शेलार यांच्या निधनानं राजकीय वर्तुळातून हळहळ
SHARES

काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांच्या आत्महत्येनंतर राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. अॅड. शेलार हे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात. परंतु पुढे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही खास सहकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. आघाडी सरकारवर जेव्हा घोटाळ्यांचे आरोप केले जायचे तेव्हा प्रसारमाध्यमांद्वारे काँग्रेसची प्रभावी व ठोस बाजू मांडण्याचे काम त्यांनी केलं होतं.

महादेव शेलार पहिल्यापासून काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते होते. सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. ते स्वत: वकील असल्यामुळे माध्यमांमधील प्रत्येक चर्चेत काँग्रेसची बाजू चांगल्याप्रकारे मांडत. त्यामुळे एक उत्तम प्रवक्ता म्हणून त्यांची ओळख बनली होती.



महादेव शेलार हे कायम हसतमुख,मनमिळावू आणि सहकार्यासाठी तत्पर असायचे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस असताना जनता दरबारच्या माध्यमातून काँग्रेस पक्षातील मंत्री व नागरिकांमधील एक दुवा म्हणून त्यांनी उत्तम काम केले. सतत कार्यमग्न राहणाऱ्या अॅड. महादेवराव शेलार यांच्या निधनानं पक्षाचे मोठे नुकसान झाले असून, मी एक व्यक्तिगत मित्र गमावला आहे, या शब्दात दुःख व्यक्त करून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा