परळ - परळ पूर्व भोईवाडा हॅटमॅट काॅलनी येथील संपूर्ण पाण्याच्या पाईपलाइन नुतनीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जेष्ठ शिवसैनिक बाबू केसरकर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्या आला. नगरसेवक नंदकिशोर विचारे यांच्या निधीतून या पाईप लाईनचे काम करण्यात येणार आहे. भोईवाडा येथील हॅटमॅट काॅलनीतील पाण्याची पाईप लाईन ही अनेक वर्षांपूर्वी पासुन नादुरूस्त होती. मात्र दुरूस्ती नंतर मुबलक पाणीपुरवठा हॅटमॅट काॅलनी येथे होणार आहे त्यामुळे नगरसेवक नंदकिशोर विचारे यांचे स्थानिक रहिवाश्यांनी विशेष आभार मानले.
या वेळी शाखाप्रमुख राजन आबिटकर,महिला शाखा संघटक वैशाली चौधरी, जेष्ठ शिवसैनिक शिवराम अमृस्कर, शाखाप्रमुख योगेश केसरकर,उप शाखाप्रमुख प्रविण फाटक, मिरा निंबाळकर, साधना राऊळ आदी मान्यवर आणि रहिवासी उपस्थित होते