Advertisement

कुरारमधील रस्त्याला आबांचं नाव


कुरारमधील रस्त्याला आबांचं नाव
SHARES

कुरार - मालाड पूर्व कुरारगाव विभाग क्र. 38 मधील स्वाती हॉटेल ते संतोषी माता मंदिर नाक्यापर्यंत रस्त्याला स्व. आर. आर. पाटील मार्ग असे नामकरण करण्यात येणार आहे. या नामकरण प्रस्तावाला महापालिका विभागानं मंजूरी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका रुपाली रावराणे यांनी पी उत्तर प्रभाग समितीकडे यासंदर्भाचा प्रस्ताव सादक केला होता. त्यानंतरची कार्यालयीन कारवाई सुरू असताना सदर प्रस्तावासंबंधी बुधवारी महापालिका सभागृहात चर्चा झाली. तसंच अभिप्राय देखील सकारात्मक आलेला आहे. या नामकरणाचा अंतिम पत्र हाती मिळाल्यानंतर मुलीच्या शिक्षणाविषयी सामाजिक संदेशाची प्रतिकृती तयार करून पुढील महिन्यात 15 नोव्हेंबर रोजी या नियोजित मार्गाचा नामकरण सोहळा करण्यात येणार असल्याची रावराणे यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय