न. चिं. केळकर मार्गाचे अर्धवट काम पूर्ण; 'मुंबई लाइव्ह'चा दणका

 Dadar (w)
न. चिं. केळकर मार्गाचे अर्धवट काम पूर्ण; 'मुंबई लाइव्ह'चा दणका

दादर पश्चिमेकडील वादग्रस्त न. चिं. केळकर मार्गावरील डांबरीकरणाचे काम कंत्राटदाराने अर्धवट टाकूनही हे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिका करत होती. मात्र ‘मुंबई लाइव्ह’ने या अर्धवट कामाचे वास्तव महापालिकेसमोर उघड केल्यानंतर प्रशासनाचे धाब दणाणले. अखेर कंत्राटदाराने रविवारी रात्री व सोमवारी सकाळी या मार्गावरील अपूर्ण काम लगबगीने पूर्ण करून सुटकेचा नि:श्वास सोडला.

न. चिं. केळकर मार्गावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासन करत होती. परंतु, शिवाजी मंदिर नाट्यगृह आणि प्लाझा सिनेमासमोर दोन भागांमध्ये डांबरीकरणाचे काम अपूर्ण राहिले होते. प्रशासनाने 3 जूनपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील, असा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात या रस्त्याचे काम आधीच बंद करून कंत्राटदाराने काढता पाय घेतला होता.

याबाबतचे वृत्त 'मुंबई लाइव्ह'ने शनिवारी 10 जून रोजी दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने आर. के. मधानी कन्स्ट्रक्शन कंपनी या कंत्राटदाराला काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.


हेही वाचा- 

महापालिकेला बेअब्रू करणाऱ्या केळकर मार्गाचे काम अर्धवटच

हातात पाटी देऊनही, 'त्या' रस्त्याचे काम अर्धवटच!


बांधकाम सामग्री उपलब्ध नसल्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण होऊ शकली नाहीत. ज्या भागात रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण व्हायला हवी, तेथे बांधकाम सामग्री उपलब्ध करून दिली जात होती. मागील काही वर्षांमध्ये पेव्हर ब्लॉकचा वापर अधिक झाल्याने मास्टिक अस्फाल्टचा वापर कमी होत होता. त्यामुळे ही सामग्री सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे जेथे मोठी कामे हाती घेण्यात आली होती, तेथेच ही सामग्री पुरविण्यात येत होती. न. चिं. केळकर मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा विचारही प्रशासनाचा होता. परंतु ते तात्काळ करणे शक्य नसल्यामुळे या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले.
- संजय दराडे, रस्ते प्रमुख अभियंता

Loading Comments