सलमानने केले आरेत शौचालयाचे उद्घाटन

Aarey Colony
सलमानने केले आरेत शौचालयाचे उद्घाटन
सलमानने केले आरेत शौचालयाचे उद्घाटन
See all
मुंबई  -  

गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीमध्ये शुक्रवारी बॉलिवडूचा दबंग सलमान खान आला होता. शुटींगसाठी नव्हे, तर एका शौचालयाच्या उद्घाटनासाठी. आरे कॉलनीमध्ये महापालिका आणि सलमान खानच्या बिईंग ह्युमन संस्थेच्या मदतीने शौचालय बांधण्यात आले आहे. या शौचालयाचे उद्घाटन सलमान खान आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सलमान खानने स्वच्छतेचे महत्व पटवून देत शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

500 मीटर अंतरावर एक शौचालय व्हावे असे महापालिकेचे नवे धोरण आहे. महापालिकेच्या या धोरणाला सलमान देखील पाठिंबा देत आहे. आधीच विविध माध्यमातून कायम मदतीचा हात पुढे करणारा सल्लू आता मुंबईकरांना स्वच्छतेचा संदेश देत आहे. विशेष म्हणजे उघड्यावर शौच करू नका या महापालिकेच्या मोहिमेचा सलमान खान ब्रँड अॅम्बॅसेडर आहे.

यावेळी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सलमान खान याचे आभार मानत तो स्वत: हून महापालिकेच्या या मोहिमेत सहभागी झाल्याचे सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.