समाज कल्याण केंद्राचे भुमीपुजन

 Goregaon
समाज कल्याण केंद्राचे भुमीपुजन
समाज कल्याण केंद्राचे भुमीपुजन
समाज कल्याण केंद्राचे भुमीपुजन
See all

जोगेश्वरी- लोटस पार्क, वीर सावरकर क्रीडांगण, जयकोच या ठिकाणी समाज कल्याण केंद्राच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा शनिवारी पार पडला. इमारतीचे भुमिपुजन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. या समाजमंदिराला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावं,अशी मागणी सुभाष देसाईनी यांनी या वेळी केली. या समाज मंदिराचा उपयोग अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू, महिला विभागसंघटक साधना माने, प्रभाग समिती अध्यक्षा लोचना चव्हाण, उपविभागप्रमुख शशांक कामत, गोरेगाव विधानसभा संघटक स्नेहा गोलतकर, महिला उपविभाग संघटक पूनम वैद्य आणि सुमंगल कोलथलकर, नगर उपअभियंता व्ही.डी.कल्याणकर, शाखाप्रमुख अजित भोगले, महिला शाखासंघटक रजनी नावगे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments