Advertisement

महापालिकच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार संजय सेठींनी स्वीकारला

संजय सेठी हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९९२ च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनामिक्स’ मधून अर्थशास्त्रात ‘मास्टार’ ची पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ठाणे आणि नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हनणूनही काम केलं आहे. याशिवाय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिलं आहे.

महापालिकच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार संजय सेठींनी स्वीकारला
SHARES

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या संजय सेठी यांनी आपल्या पदाचा भार शुक्रवारी स्वीकारला. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी यांनी आपल्या पदाची सुत्रे त्यांच्याकडे सोपवली. 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अर्थात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनी शुक्रवारी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडून पदभार स्वीकारला.


१९९२ च्या बॅचचे अधिकारी

संजय सेठी हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९९२ च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनामिक्स’ मधून अर्थशास्त्रात ‘मास्टार’ ची पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ठाणे आणि नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हनणूनही काम केलं आहे. याशिवाय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिलं आहे. एकूण २६ वर्षांच्या आपल्या प्रशासकीय कारकिर्दित त्यांनी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनामध्ये अश्या विविध महत्वपूर्ण पदावर काम केलं आहे.


संजय मुखर्जींची बदली

संजय मुखर्जी यांची बदली वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या सचिवपदी झाली आहे. या विभागाचे सचिव संजय देशमुख हे ३० सप्टेंबरला सेवानिवृत्त होत असून त्यांच्या रिक्तजागी त्यांची बदली झाली आहे. संजय मुखर्जी यांना स्थायी समितीच्यावतीनं पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा