पालकांनो..शाळेची शिस्त पाळा

 Bandra west
पालकांनो..शाळेची शिस्त पाळा

मुलांबरोबर आता पालकांनाही शाळेचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. मुंबईतल्या वांद्रे येथील रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेने पालकांसाठी एक नियमावली तयार केली आहे. पालक जेव्हा 30 मार्चला शाळेत मुलांचं प्रगतिपुस्तक घेण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या हातात प्रगतिपुस्तकाबरोबरच नियमावलीची यादीही पालकांना दिली.

या नियमावलीनुसार पालकसभेला किंवा इतर कोणत्याही कामानिमित्ताने शाळेत येताना पालकांनी शालीन कपडे घालूनच शाळेत येणे अपेक्षित आहे. या शाळेने केलेल्या नियमांमुळे पालक चांगलेच गोंधळले आहेत.

काय आहेत शाळेचे नियम?
1) नियमावलीत पालक सभेस येताना पालकांनी सभ्य आणि शालीन कपडे घालावेत
2) पालकसभा सुरू होण्याआधी पालकांनी आपला मोबाइल शाळेच्या रिसेप्शन काऊंटरवर जमा करावा
3) शाळेच्या कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागू नये, तसेच त्यांना नाहक प्रश्न विचारू नयेत

शाळेच्या या नियमावलीबद्दल मुख्याध्यापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न मुंंबई लाइव्हने केला असता, त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. शाळेच्या या नियमावलीवर पालकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

Loading Comments