Advertisement

स्कॉर्पिअन श्रेणीतील चौथी पाणबुडी 'आयएनएस वेला'चं जलावतरण

स्कॉर्पिअन श्रेणीतील चौथी पाणबुडी समुद्रात झेपावण्यात आली आहे. ‘आयएनएस वेला’ नाव असलेल्या या पाणबुडी फ्रेंच तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं तयार झाली असून सोमवारी माझगाव बंदराजवळ जलावतरण करण्यात आलं आहे.

स्कॉर्पिअन श्रेणीतील चौथी पाणबुडी 'आयएनएस वेला'चं जलावतरण
SHARES

स्कॉर्पिअन श्रेणीतील चौथी पाणबुडी ‘आयएनएस वेला’चं सोमवारी माझगाव बंदराजवळ जलावतरण करण्यात आलं. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या सरकारी कंपनीनं वेळेआधीच ही पाणबुडी बांधून पूर्ण केली. ही पाणबुडी फ्रेंच तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं तयार झाली आहे.


पाणबुडीची समुद्री चाचणी

भारतीय नौदलाच्या ताफ्यातील शिशुमार श्रेणीतील पाणबुड्यांची जागा ६ स्कॉर्पिअन पाणबुड्या घेणार आहेत. याबाबत २००५ मध्ये केंद्र सरकारनं निर्णय घेतला होता. तसंच, या श्रेणीतील ‘आयएनएस कलवरी’ या पहिल्या पाणबुडीची समुद्री चाचणी २७ ऑक्टोबर, २०१५ रोजी झाली होती. ही पाणबुडी १४ डिसेंबर, २०१७ रोजी नौदलाच्या ताफ्यात आली.

या श्रेणीतील 'आयएनएस खंदेरी'चं १२ जानेवारी, २०१७ रोजी तर ‘आयएनएस करंज’चे ३१ जानेवारी, २०१८ रोजी जलावतरण झालं. या दोन्ही पाणबुड्यांची समुद्री चाचणी अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर आता चौथ्या पाणबुडीची बांधणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळं लवकरच नौदलाच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे. 


सर्व पाणबुड्या सारख्याच

स्कॉर्पिअन श्रेणीतील सर्व पाणबुड्या सारख्याच असून, त्यांची समुद्री चाचणी लवकर पूर्ण करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयानं दिले आहेत. याआधी प्रत्येक पाणबुडीला चाचणीसाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागत होता. मात्र, आता वर्षभराच्या आतच पाणबुड्या नौदलाकडं सुपूर्द करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयानं दिले आहेत. 



हेही वाचा -

CBSE: दहावीचा निकाल जाहीर, ९१.१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

नाहीतर, मुंबई विमानतळ बंद करू, भारतीय कामगार सेनेचा इशारा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा