Advertisement

अमृता फडणवीस, सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, Y+ सुरक्षा कवच

याशिवाय उद्योगपती अजय पिरामल आणि उद्धव ठाकरे यांचे माजी पीए मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

अमृता फडणवीस, सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, Y+ सुरक्षा कवच
SHARES

पंजाबी रॅपर-गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडांनी अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. सलमान खानच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे.

बिश्नोई गँगने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या धमकीनंतर आता त्याच्या सुरक्षेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सलमानला Y प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

दरम्यान अलीकडेच पंजाब पोलीस मुख्यालयावर काही अज्ञातांनी हल्ला केला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांच्या खास पथकाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी मोड्यूलच्या दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. अटक केलेल्या या दोन संशयितांपैकी एक अल्पवयीन मुलगा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचा अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये पोलिसांकडून शोध घेतला जात होता. दरम्यान आता याच अल्पवयीन मुलाला बॉलिवूड अभिनेता सलमान खानची हत्या करण्याची सुपारी देण्यात आली असल्याचं उघडझालं होतं .

यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांची सुरक्षा वाढवली आहे. याचा अर्थ सलमान खान आणि अमृता फडणवीस यांना आता चार शस्त्रधारी सुरक्षारक्षक 24 तास सुरक्षा पुरवणार आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनाही Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर यांना 2005 पासूनच सुरक्षा आहे. 2019 मध्ये ही X दर्जाची करण्यात आली होती. आता ती वाढवून Y+ करण्यात आली.

भारताचे सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचे नातेवाईक अजय पीरामल यांचीही सुरक्षा वाढवली आहे. आता त्यांना Y+ सुरक्षा कवच असेल. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला सातत्याने मिळणाऱ्या धमकीनंतर सुरक्षा वाढवण्यात आली.

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटानंतर त्यांची सुरक्षा वाढवली आहे.



हेही वाचा

मुंबईकरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

मुंबईकरांनो लक्ष द्या! संपूर्ण शहरात 10 दिवसांसाठी पाणीकपात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा