Advertisement

मुंबईकरांनो लक्ष द्या! संपूर्ण शहरात 10 दिवसांसाठी पाणीकपात

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा.

मुंबईकरांनो लक्ष द्या! संपूर्ण शहरात 10 दिवसांसाठी पाणीकपात
SHARES
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC), मंगळवार (आज), 1 नोव्हेंबरपासून 10 दिवसांसाठी 10 टक्के पाणीकपात जाहीर केली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा      करणा-या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मंगळवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२२ ते गुरुवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. सदर तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबईमधील व बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱया पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

सदर दुरुस्ती कामाच्या कारणास्तव मंगळवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२२ ते गुरुवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुंबई महानगरात व बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱया पाणीपुरवठ्यात देखील १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा