शिवाजी पार्कमध्ये महिलांसाठी स्वसंरक्षण शिबीर

 Shivaji Park
शिवाजी पार्कमध्ये महिलांसाठी स्वसंरक्षण शिबीर
Shivaji Park, Mumbai  -  

कठीण प्रसंगात अनेकदा स्वसंरक्षणासाठी महिलांना त्यांच्याजवळील मिरचीची पूड किंवा तत्सम हत्याराचा वापर करण्याचे भान राहत नाही, म्हणूनच आत्मविश्वास हा देखील स्वसंरक्षणाचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, कारण त्यातून आपली देहबोली समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल दरारा निर्माण करू शकते, त्याचबरोबर आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहिले पाहिजे, असे विचार शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक गुलाब पाटील यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने खास मुली आणि महिलांसाठी निःशुल्क स्वसंरक्षण शिबिराच्या मंगळवारी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या. या शिबिरात महिलांचा विशेष सहभाग आहे. पाटील यांनी या वेळी काही प्रात्याक्षिके आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. 

या वेळी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निलेश मोरे, एस. के. पाडवी, आर. एन. पवार, एस. एस. कहाडळ तसेच स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, प्रशिक्षक राजेश खिलारी, राजन जोथाडी, अधीक्षक संजय चेंदवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महिलांना समाजात मोकळेपणाने वावरता यावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, स्वसंरक्षणाअभावी त्यांची कार्यक्षमता वाया जाऊ नये, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापुढील काळातदेखील अशा उपक्रमांना निश्चितपणे प्राधान्य दिले जाईल, असे विचार स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले. हे संरक्षण शिबीर (सेल्फ डीफेन्स) प्रशिक्षण 10 ल ते 15 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

Loading Comments