Advertisement

सीरम इनस्टिट्यूट आग : मृत कामगारांच्या कुटुंबियांना २५ लाख

मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना सीरम कंपनीकडून प्रत्येकी २५ लाखांची मदत केली जाणार आहे.

सीरम इनस्टिट्यूट आग : मृत कामगारांच्या कुटुंबियांना २५ लाख
SHARES

सीरम इनस्टिट्यूटच्या आग दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना सीरम कंपनीकडून प्रत्येकी २५ लाखांची मदत केली जाणार आहे. सीरम इनस्टिट्यूट तर्फे ही मदत केली जाणार आहे. सीरमच्या ट्विटर हँडलवरून या संदर्भात माहिती देण्यात आली.

सीरम इनस्टिट्यूटच्या आग दुर्घटनेत सहाव्या मजल्यावर ५ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मयत हे बांधकाम मजूर होते. तसंच वेल्डिंग करताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. रामा शंकर हारिजन, बिपीन सरोज, सुशील कुमार पांडेय, महेंद्र इंगळे आणि प्रतिक पाशाते अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व इलेक्ट्रीक काम करणारे मजुर होते.

दरम्यान कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला लागलेली आग पुन्हा भडकली आहे. दुपारी लागलेली आग अग्निशमन दलाला २ ते ३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर विझविण्यात यश आले. पण संध्याकाळी ७ वाजता या इमारतीच्या 6व्या मजल्यावर आग पुन्हा भडकली. ही आग विझविण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटला लागलेल्या आगीसंदर्भात अदर पुनावाला यांच्याशी बोलले. शुक्रवारी २२ जानेवारी रोजी दुपारी पुणे इथं प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं पुण्याकडे रवाना होतील. साडेतीनच्या सुमारास हडपसर परिसरातील सीरमच्या आग लागलेल्या प्लांटला भेट देतील आणि पाहणी करतील.

सुदैवानं कोव्हिशील्ड लस सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचे काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही. कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली जागा सुरक्षित आहे.हेही वाचा

सीरम इंस्टीट्यूटमधील आग पुन्हा भडकली

सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीवर अदर पुनावाला म्हणाले…

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा