
मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील शताब्दी हॉस्पिटल (Shatabdi Hospital) लवकरच सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतरित होणार आहे. डॉ. विपिन शर्मा Dr Vipin Sharma यांनी पुनर्विकासाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Municipal General Hospital येथे सुरू असलेल्या 325 खाटांच्या सुपर-स्पेशालिटी प्रकल्पाचा आढावा घेताना काम वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. या नव्या सुविधेत ऑन्कोलॉजी, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, यकृत आणि मूत्रपिंड उपचारांसाठी अत्याधुनिक विभाग असणार आहेत.
Brihanmumbai Municipal Corporation (BMC) कडून 301.09 कोटी रुपयांचा हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. यात निवासी वसतिगृह आणि इतर पूरक सुविधा देखील असणार आहेत. सध्या रुग्णालयात 444 खाटा असून, सुमारे 30 ते 40 लाख लोकसंख्येला सेवा दिली जाते. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इमारतीत अतिरिक्त मजले वाढवण्याचाही विचार सुरू आहे.
डॉ. शर्मा यांनी रुग्णालयातील प्रयोगशाळांसाठी NABH मानांकनाच्या गरजांचा आढावा घेतला. तसेच ICU, OPD, ऑपरेशन थिएटर आणि वॉर्ड्सची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला.
याशिवाय, त्यांनीटोपिवाला मेटरनिटी होम Topiwala Maternity Home या 30 खाटांच्या रुग्णालयाची पाहणी केली आणि पुनर्विकासाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच ओशिवारा मेटरनिटी होम Oshiwara Maternity Home प्रकल्पाचा आढावा घेतला, ज्यामध्ये खाटांची संख्या 150 पर्यंत वाढवली जाणार आहे.
डॉ. शर्मा यांनी सर्व प्रकल्पांना प्राधान्य देत कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जेणेकरून पश्चिम उपनगरांतील नागरिकांना अधिक सक्षम आणि सुलभ आरोग्यसेवा मिळू शकेल.
हेही वाचा
