महाराष्ट्र दिनी शिवाजी पार्क उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र

 Dadar (w)
महाराष्ट्र दिनी शिवाजी पार्क उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र
Dadar (w), Mumbai  -  

महाराष्ट्र दिनानिमित्ताने 1 मे 2017 रोजी दादरच्या शिवाजी पार्क परिसरातल्या आकाशात हवाई उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. 1 मे रोजी शिवाजी पार्क हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या संचलन समारंभात दहशतवादी वा असामाजित तत्वांकडून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या हवाई क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडवण्यात येणारी अतिलघू (मायक्रोलाईट) विमाने, प्रवासी विमानांना प्रतिबंध लावण्यात आल्याचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलमानुसार मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.

Loading Comments