Advertisement

सणांच्या कालावधीत रात्री ११ पर्यंत दुकान सुरु राहणार


सणांच्या कालावधीत रात्री ११ पर्यंत दुकान सुरु राहणार
SHARES

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम कायदा लागू करण्यात आला आहे. या अधिनियमांतर्गत सणांच्या कालावधीत रात्री ११ पर्यंत दुकान सुरु ठेवण्याची मुभा राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. राज्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. या कालावधीत विविध वस्तू व खाद्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.


अधिनियमानुसार वेतन

सणांच्या दिवशी रात्री ११ पर्यंत दुकाने सुरु राहिली, तरी त्याबाबत कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या कामाच्या वेळेपेक्षा जास्त तास काम करावं लागत असेल, तर कामगारांना अधिनियमानुसार विहित करण्यात आलेल्या दरानुसार वेतन देण्यात यावं. तसेच साप्ताहिक सुट्यांचा लाभ न मिळाल्यास प्रत्येक कर्मचाऱ्याला साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी. अशा सूचना कामगार आयुक्त कार्यालयीन परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.


२०१८ मध्ये 'या' सणांना ठेवता येतील दुकाने सुरू:

  • मकर संक्रांत १३ ते १५ जानेवारी 
  • महाशिवरात्री १२ ते १४ फेब्रुवारी 
  • होळी २८ फेब्रुवारी ते ३ मार्च 
  • गुढीपाडवा १७ ते १९ मार्च 
  • श्रीराम नवमी २४ ते २६ मार्च 
  • महावीर जयंती व गुड फ्रायडे २८ ते ३१ मार्च 
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १३ ते १५ एप्रिल 
  • बुद्ध पौर्णिमा २९ एप्रिल ते १ मे 
  • रमजान ईद १६ मे ते १७ जून 
  • आषाढी एकादशी २२ ते २४ जुलै 
  • पतेती १६ ते १८ ऑगस्ट 
  • बकरी ईद २१ ते २३ ऑगस्ट 
  • नारळी पौर्णिमा २४ ते २७ ऑगस्ट 
  • श्रीकृष्ण जयंती १ ते ३ सप्टेंबर 
  • गणेश चतुर्थी/मोहरम १२ ते २४ सप्टेंबर 
  • नवरात्र उत्सव/दसरा/कोजागिरी पौर्णिमा ९ ते २५ ऑक्टोबर 
  • दिवाळी ४ ते १० नोव्हेंबर 
  • कार्तिकी एकादशी व ईद-ए-मिलाद १८ ते २१ नोव्हेंबर
  • गुरुनानक जयंती २२ ते २४ नोव्हेंबर 
  • नाताळ २४ ते २६ डिसेंबर 



हेही वाचा-

मुंबईकरांना मिळणार 'नाईटलाईफ'चा अनुभव, २४ तास खुली राहणार दुकानं


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा