Advertisement

मुंबईकरांना मिळणार 'नाईटलाईफ'चा अनुभव, २४ तास खुली राहणार दुकानं


मुंबईकरांना मिळणार 'नाईटलाईफ'चा अनुभव, २४ तास खुली राहणार दुकानं
SHARES

मुंबईसह राज्यभरातील सर्व दुकाने २४ तास खुली राहण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं असून मंगळवारी महाराष्ट्र दुकान आणि आस्थापना अधिनियम, २०१७ ही अधिसूचना काढली आहे. ही अधिसूचना पारित झाल्यास मुंबईकरांना खऱ्या अर्थाने नाईटलाईफचा अनुभव घेता येणार आहे.


कुणाकुणाचा समावेश?

यामध्ये रेस्टाॅरंट (ज्यामध्ये दारूचा समावेश नसेल), सिनेमागृह, सलून, हायपर माॅल, बँक, उपचार क्लिनिक आणि करपात्र दुकानांचा समावेश असेल. या सर्व आस्थापना केवळ रात्रीच नव्हे, तर तीन शिफ्टमध्ये सुरू ठेवता येतील.


कायदा लागू करण्यास तयार

दुरूस्तीनंतर दुकान आणि आस्थापना अधिनियम हे विधेयक आॅगस्ट २०१६ मध्ये दोन्ही सभागृहात मंजूर झाले होते. त्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे हा कायदा लागू करण्यास वाट मोकळी झाली आहे.


सद्यस्थिती काय?

सद्यस्थितीत कायद्यानुसार शहरातील सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतात. त्यातही व्यावसायिक दुकाने रात्री ९.३० वाजेपर्यंत आणि रेस्टाॅरंट रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतात. या अधिसूचनेत महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने रात्रीच्या शिफ्टसाठी त्यांनी अनुमती आणि काही नियमांचाही समावेश करण्यात आला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा