Advertisement

शीव रुग्णालयातील व्हेंटिलेटर्स घेताहेत अखेरचा 'श्वास'


शीव रुग्णालयातील व्हेंटिलेटर्स घेताहेत अखेरचा 'श्वास'
SHARES

शीव रुग्णालयातील व्हेंटिलेटर्सच 'व्हेंटिलेटर्स'वर असून ते कोणत्याही क्षणी बंद पडतील, अशी स्थिती अाहे. वार्षिक देखभाल करून या व्हेंटिलेटर्सचं आयुष्य वाढवलं जात आहे. सर्व व्हेंटिलेटर्सची खरेदी करून ९ वर्ष उलटत आली असून वार्षिक देखभाल व दुरुस्ती करून त्यांना जीवनदान दिलं जात असलं तरी कोणत्याही क्षणाला या व्हेंटिलेटर्सचे ठोके बंद पडण्याची भीती आहे.


नऊ वर्षांपूर्वी खरेदी

मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमधील गंभीर स्वरूपाच्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी कृत्रिम श्वासोच्छवास घेण्यासाठी व्हेला व एव्हिया व्हेंटिलेटर्संची खरेदी २००९मध्ये करण्यात आली होती. यापैकी २५ व्हेंटिलेटर्स व ५ एव्हिया व्हेंटिलेटर्सच हे शीवमधील लोकमान्य रुग्णालयातील विविध अतिदक्षता विभागांमध्ये वापरात आहेत. त्याचा दोन वर्षांचा हमी कालावधी संपुष्टात आल्यानंतर पुढील पाच वर्षांकरिता वार्षिक देखभाल व दुरुस्तीसाठी मेसर्स लाईफ केअर मेडिकल सिस्टीम या कंपनीची निवड करण्यात आली होती.


...तर ४-५ वर्ष उत्तम सेवा देतील

मात्र, हे पाच वर्षांचं कंत्राट मे २०१६मध्ये संपुष्टात आल्यानंतर पुढील पाच वर्षांकरिता याच कंपनीला सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून वार्षिक देखभाल व दुरुस्तीचं कंत्राट देण्यात आलं. त्यामुळे हा कालावधी येत्या २०२१मध्ये संपुष्टात येणार आहे. व्हेंटिलेटर्सची वार्षिक देखभाल व दुरुस्ती केल्यास पुढील अजून ४ ते ५ वर्षे उत्तमरित्या सेवा देवू शकतील, असा विश्वास शीव रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी व्यक्त केलाय.


देखभाल-दुरुस्ती अावश्यक

शीव रुग्णालयातील वाढता व्याप पाहता तसंच ही यंत्रे जीवनरक्षक स्वरूपाची असल्यानं ती २४ तास कार्यरत ठेवणं आवश्यक अाहे. तसंच त्यांची वार्षिक देखभाल व दुरुस्ती आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जर या व्हेंटिलेटर्सची नियमित देखभाल केली गेली नाही तर ती बंद पडतील. तसं झाल्यास त्यांच्या कमतरतेमुळे रुग्णसेवेवर विपरित परिणाम होईल, अशी भीतीही रुग्णालयाच्या तंज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.


वापरावर अायुर्मान अवलंबून

व्हेंटिलेटर्सचा वापर किती तास केला गेला, यावर व्हेंटिलेटर्संचं आयुष्य ठरतं. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या व वापर लक्षात घेता, गेली ९ वर्षे या व्हेंटिलेटर्संचा वापर हा खूपच असल्यामुळे वार्षिक देखभाल केल्यानंतरही त्यांची पुढे साथ मिळणे कठीण असल्याचं मत रुग्णालयातील तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातंय.


हेही वाचा -

मुख्यमंत्र्यांनी केली 'पंढरपूर वारी' रद्द!

काँग्रेसची मुंबईत 'प्यार की झप्पी'वाली पोस्टरबाजी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा