Advertisement

मुंबईत लेप्टोस्पायरोसिसमुळे एका मुलाचा मृत्यू


मुंबईत लेप्टोस्पायरोसिसमुळे एका मुलाचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनसोबतच इतर आजारांनी डोकवर काढलं आहे. मलेरिया, डेंग्यूप्रमाण आता लेप्टोच्या रुग्णांची संख्या ही ऑगस्टच्या तुलनेत काही अंशी वाढली आहे. मुंबईत लेप्टोस्पायरोसिसमुळे १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात लेप्टोमुळे झालेला पहिला मृत्यू आहे.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. या पाण्यातून चालण्यामुळे संसर्ग झाल्याने अनेकांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाली. माटुंगा येथील १६ वर्षांच्या मुलाला ३१ ऑगस्टला तापासह श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केले. तपासणीमध्ये त्याला लेप्टो असल्याचे निदान झाले.

उपचारादरम्यान ४ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला. ऑगस्टमध्ये पडलेल्या सर्वाधिक पावसानंतर शहरातील लेप्टोच्या रुग्णांची संख्या जुलैच्या तुलनेत १४ वरून थेट ४५वर पोहोचली होती. सप्टेंबरमध्येही जोरदार पाऊस पडल्याने मुंबईत पाणी साचले होते. परिणामी लेप्टोच्या रुग्णांची संख्या या महिन्यात वाढून ५४ वर गेली आहे.

सप्टेंबरमध्ये मलेरियांच्या रुग्णांची संख्या ऑगस्टच्या तुलनेत ७० टक्क्यांनी कमी करण्यात महापालिकेला काही प्रमाणात यश आले आहे. ऑगस्टमध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या १,१३७ पर्यंत पोहोचली होती. या वर्षी जुलैमध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली.

मलेरिया विभागातील सर्व कर्मचारी कोरोनाच्या कामात गुंतल्याने पसरलेली मलेरियाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने कंबर कसल्याने गेल्यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये नोंदल्या गेलेल्या मलेरियाच्या रुग्णांपेक्षा यावर्षी रुग्णांची संख्या घटली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा