हा स्कायवॉक की कचरा पेटी !


SHARE

ग्रँटरोड- ग्रँटरोड स्कायवॉकची दुर्दशा झाली आहे. स्कायवॉकवर ठिकठिकाणी थुंकलेले दिसून येत आहे. प्रवाशांना दररोज या घाणीचा सामना करावा लागतोय. नागरिकांनी अनेकदा तक्रार करुनही कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. स्टेशनच्या बाजूलाच पालिकेच्या डी वॉर्डचं ऑफिस आहे. मात्र तरीही पालिका या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या