Advertisement

सर्पमित्रांना सरकारी ओळखपत्र मिळणार

अनेकदा आपला जीव धोक्यात घालून सर्पमित्र सापांना पकडून सुरक्षित स्थळी सोडून देतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना अपघात विमा मिळावा अशी बऱ्याच काळापासून मागणी होती.

सर्पमित्रांना सरकारी ओळखपत्र मिळणार
SHARES

ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी विशेषतः सापांपासून (snake) होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना (snake rescuers) लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि 10 लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे.

त्यांना 'अत्यावश्यक सेवा' आणि 'फ्रंटलाइन वर्कर' म्हणून दर्जा देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याकडे शिफारस करण्यात येईल’, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली.

वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या त्रासातून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी सर्पमित्र नेहमीच धावून येतात. अनेकदा आपला जीव धोक्यात घालून ते सापांना पकडून सुरक्षित स्थळी सोडून देतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत, त्यांना अपघात विमा मिळावा अशी बऱ्याच काळापासून मागणी होती.

सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र (ID card) देण्याबरोबरच त्यांना 10 लाख रुपयांचा अपघात विमा देण्याची योजना आखण्यात येत आहे. यासाठी सविस्तर कार्यपद्धती तयार केली जाईल. या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कार्याला अधिकृत मान्यता मिळेल आणि त्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल.

याशिवाय सर्पमित्रांच्या कामाचे महत्त्व लक्षात घेता त्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करण्याची आणि आपत्ती व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग बनवण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. वनविभागाच्या संकेतस्थळावर सर्पमित्रांची अधिकृत माहिती उपलब्ध होण्यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात येणार आहे.

ही सर्व माहिती वनविभागाच्या पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे गरजूंना तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधणे सोपे होईल आणि त्यांच्या कामात अधिक पारदर्शकता येईल अशी अपेक्षा मिलिंद म्हैसकर यांनी व्यक्त केली.



हेही वाचा

केंद्र सरकारकडून 25 अॅप्सवर बंदी

मुंबईतल्या 'या' स्थानकांवर पेपर कपऐवजी कुल्लड वापरण्याचे आदेश

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा