Advertisement

झंडा उंचा रहे हमारा!


झंडा उंचा रहे हमारा!
SHARES

तिरंगा... त्याचं ते डौलानं फडकणं, डोळ्याचं पारणं फेडतो. नुसतं त्याच्याकडे पाहूनच देशावर मनापासून प्रेम करणाऱ्या देशभक्ताच्या भावना उचंबळून येतात. देशातील लोकांच्या देशभक्तीचं ते प्रतीक आहे. असा हा झेंडा मुंबईत दोन ठिकाणी फडकणार आहे. पण याचं वैशिष्ट्य म्हणजे हा झेंडा १५० आणि १२६ फुट असणार आहे.


कुठे उभारणार झेंडा?

मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया इथं आणि कूपरेज गार्डन इथं दुसरा झेंडा फडकवण्यात येणार आहे. गेट वे ऑफ इंडिया इथला झेंडा हा १५० फुट उंच असणार आहे. तर कूपरेज गार्डन इथल्या डॉ. आंबेडकर प्रतिमा चौकवर १२६ फुट उंच झेंडा असणार आहे. याशिवाय डॉ. आंबेडकर प्रतिमा चौकवर अखंड भीम ज्योती प्रज्वलीत करण्यात येईल. यासाठी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.


कुणी ठेवला प्रस्ताव?

शिवसेना नेते सुभाष देसाई आणि भाजपाचे नेते राज पुरोहित यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. बुधवारी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यापूर्वी देशातील सर्वात उंच झेंडा मुंबईच्या हज हाऊस इथं लावण्यात आला होता. याची उंची ३५० फुट उंच आहे. याशिवाय सरकारनं ७५ रल्वे स्टेशन परिसरात १०० फुट उंच तिरंगा लावण्याची अनुमती दिली आहे. ज्यामध्ये मुंबईच्या सात स्टेशन्सचा समावेश आहे.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा