समाजवादी पक्ष स्वबळावर लढणार

 Mumbai
समाजवादी पक्ष स्वबळावर लढणार

मुंबई - महानगर पालिका निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष सज्ज झाला असून 115 ते 120 जागा लढवण्याचा निर्णय पक्षानं घेतल्याची माहिती सपाचे नेते अबु आझमी यांनी दिली. मागील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षानं युती करण्याच्या नावानं आम्हाला धोका दिला. त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करण्याबाबतचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं म्हणत स्वबळावर निवडणुक लढवण्याचा निर्णय सपाने घेतला. तर पालिका निवडणुकीत नगरसेवक आणि पक्षाने केलेल्या कामांच्या जोरावरच जनतेसमोर मत मागण्यासाठी जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

14 फुटापेक्षा उंच झोपड्यांविरोधात पालिकेकडून सुरु करण्यात आलेल्या कारवाईला सपाने विरोध केलाय. झोपड्यांची उंची वाढण्यास सरकार आणि पालिकाच जबाबदार आहे. त्यांनी वेळच्यावेळी कारवाई केली असती, तर उंच झोपड्यांचा प्रश्नच निर्माण झाला नसता, असं म्हणत 19 ते 20 फुटापर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याची मागणीही आझमी यांनी या वेळी केली.

Loading Comments