Advertisement

LTT स्थानकावर 24 ते 26 जून विशेष ब्लॉक

पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिर आहे, असं मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

LTT स्थानकावर 24 ते 26 जून विशेष ब्लॉक
SHARES
मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सुविधांच्या विस्तारासाठी 24 जून (बुधवार) ते दिनांक 26 जून (शुक्रवार) या कालावधीत 56 तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेणार आहे. या कामांमध्ये शंटिंग नेकचे बांधकाम, 'सिक साइडिंग'मध्ये बदल, देखभाल साइडिंग यार्ड, देखभाल साइडिंग क्र. 6, 7, 8 आणि 9 मधील 'पिट लाइन्स'चा विस्तार केला जाणार आहे.तसेच पाणीपुरवठा वाहिनी, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिनीचे वळण बदलणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिर आहे, असं मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

लोकमान्य टिळकर टर्मिनसवर 24 जूनला (बुधवार) रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 26 जून (शुक्रवार) दुपारी 4 वाजेपर्यंत असा 46 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.या ब्लॉकमुळे पहिल्या 8 तासांसाठी 'सिक कलेक्शन लाइन' आणि वॉशिंग पिट लाइन क्र. 6, 7 आणि 8 यांच्यावर परिणाम होईल; आणि पुढील 48 तासांसाठी वॉशिंग पिट लाइन क्र. 7 आणि 8 यांच्यावर परिणाम होईल.

24 जूनला चालविण्यात येणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर होणारा परिणाम :

  • 23 जूनला प्रवास सुरू करणाऱ्या खालील गाड्यांची सेवा ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. याचाच अर्थ या गाड्यांचे शेवटचे स्थानक ठाणे स्टेशन राहील.
  • गाडी क्रमांक 12620 मंगळुरू सेंट्रल - लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 22180 चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 16346 तिरुवनंतपुरम - लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस आणि
  • गाडी क्रमांक 15018 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

24 जून मेल आणि एक्सप्रेस सेवांच्या वेळापत्रकात बदल

24 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 11:35 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस - पाटलिपुत्र एक्सप्रेस आता 25 जूनला पहाटे 03:30 वाजता सुटेल.

23 जूनला प्रवास सुरू करणाऱ्या खालील गाडी ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील:
गाडी क्रमांक 22537 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्सप्रेस24 जूनला प्रवास सुरू करणाऱ्या खालील गाड्या ठाणे (thane) स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील:
  • गाडी क्रमांक 12620 मंगळुरू सेंट्रल - लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 16346 तिरुवनंतपुरम - लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस आणि
  • गाडी क्रमांक 15018 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 22110 बल्हारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 22112 अयोध्या कैंट - लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस.

25 जूनला मेल आणि एक्सप्रेस सेवांच्या वेळापत्रकात बदल

  • 25 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 00:50 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 22115 लोकमान्य टिळक टर्मिनस - करमळी वातानुकुलीत एक्सप्रेस आता दिनांक 25 जूनला 03:15 वाजता सुटेल.
  • 25 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 22:45 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस - बनारस एक्सप्रेस आता 26 जूनला 03:30 वाजता सुटेल.
  • 25 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 23:35 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस - पाटलिपुत्र एक्सप्रेस आता 26 जूनला 03:45 वाजता सुटेल.

26 जूनला चालविण्यात येणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर होणारा परिणाम

  • 24 जूनला प्रवास सुरू करणाऱ्या खालील गाड्या ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील:
  • गाडी क्रमांक 22537 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्सप्रेस आणि
  • गाडी क्रमांक 22358 गया - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

25 जूनला प्रवास सुरू करणाऱ्या खालील गाड्या ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील:

  • गाडी क्रमांक 12620 मंगळुरू सेंट्रल - लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 16346 तिरुवनंतपुरम - लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस आणि
  • गाडी क्रमांक 12880 भुवनेश्वर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

25 जूनला मेल आणि एक्सप्रेस सेवांच्या वेळापत्रकात बदल

  • 26 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 00:45 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 11099 लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव एक्सप्रेस आता दिनांक 25 जूनला 03:30 वाजता सुटेल.
  • 25 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 10:30 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 01143 लोकमान्य टिळक टर्मिनस - दानापूर एक्सप्रेस आता 26 जूनला 13:30 वाजता सुटेल.
  • 26 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 20:35 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस - शालीमार एक्सप्रेस आता 26 जूनला 21:35 वाजता सुटेल.
  • 26 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 22:45 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस - बनारस एक्सप्रेस आता 27 जूनला 03:00 वाजता सुटेल.
  • 26 जूनला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 23:35 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस - पाटलिपुत्र एक्सप्रेस आता दिनांक 27 जूनला 03:15 वाजता सुटेल.

हेही वाचा

माहिम किल्ल्याचे संवर्धन होणार

खड्ड्यांच्या तक्रारींचे 24 तासांत निवारण करण्याचे पालिकेचे आदेश

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा