गतिरोधक ठरत आहेत धोकादायक

 Dalmia Estate
गतिरोधक ठरत आहेत धोकादायक
गतिरोधक ठरत आहेत धोकादायक
See all

मुलुंड - मुलुंडमधील गतीरोधक ढासळलेल्या अवस्थेत आहेत. गव्हाणपाडा रोड, केळकर महाविद्यालय कंदील रोड, नीलमनगर रोड तसेच पाच रस्ता येथील गतीरोधक लवकरात लवकर दुरुस्त करणे गरजेचे आहे. केळकर महाविद्यालय येथे अनेक वेळा दुचाकीस्वार अडकून पडले आहेत. येथे महाविद्यालय असल्यानं इथं दुचाकीचालकांचे प्रमाण जास्त आहे.

गतीरोधक दुरुस्ती केल्यानंतरही काही दिवसातच ढासळायला सुरुवात होते. गतीरोधक दुरुस्तीचं काम निकृष्ठ दर्जाचं असल्यान ती वारंवार ढासळते असं स्थानिकांचं म्हणणं आहे . यासाठी या गतिरोधकांची दुरुस्ती एकदाच पण कायमस्वरूपी करा अशी मागणी स्थानिक करत आहेत.

Loading Comments