Advertisement

राज्यातील हुक्का पार्लरवर पूर्णपणे निर्बंध


राज्यातील हुक्का पार्लरवर पूर्णपणे निर्बंध
SHARES

मागच्या वर्षी कमला मिल्स कंपाउंडमध्ये लागलेल्या आगीत होरपळून 14 जणांचा बळी गेला होता, या घटनेनंतर राज्य सरकारने राज्यातील सर्व हुक्का पार्लरवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेत यासंदर्भाचं विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मांडलं होतं. या विधेकाला आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे.


हुक्का पार्लरवर पूर्णपणे बंदी

राज्यात हुक्का पार्लरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नशेच्या वस्तू लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यात येत होत्या. शिवाय डिसेंबर 2017 मध्ये कमला मिल कंपाऊंडला आग लागल्यानंतर राज्यातील हुक्का पार्लरवर बंदी आणण्यासाठी राज्य सरकारने कायदा करण्याचा निर्णय घेतला. शिवाय याबाबतचं विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मांडण्यात आलं होतं. या विधेयकावर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्याने या विधेकाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कुठेही हुक्का पार्लर चालवण्यास बंदी येणार आहे.


नियमांचं उल्लंघन केल्यास...

केंद्र सरकारने २००३ मध्ये लागू केलेल्या सिगारेट आणि तंबाखुजन्य उत्पादन अधिनियमात हुक्का पार्लरचा उल्लेख नव्हता. त्यामुळे हुक्का पार्लरवर बंदी घालता येणार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने सिगारेट आणि तंबाखुजन्य उत्पादन अधिनियम २००३ मध्ये सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मांडत या अधिनियमात हुक्का पार्लरचा समावेश करण्यात आला. आता हे विधेयक लागू झाल्याने नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीला 1 लाखांचा दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास ही शिक्षा होणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा