Advertisement

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हफ्ता लवकरच

जिल्हा परिषदा, अनुदानित शाळा तसेच इतर अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या हफ्त्याची थकबाकी रक्कम सप्टेंबर महिन्यातील पगारात दिली जाणार आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हफ्ता लवकरच
SHARES

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता दुसरा लवकरच मिळणार आहे. तर निवृत्तवेतनाधारकांना थकबाकीच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जुलै महिन्याच्या निवृत्त वेतनसोबत रोखीने दिली जाणार आहे. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग थकबाकीच्या दुसरा हफ्ता ऑगस्ट महिन्याच्या पगाराबरोबर दिला जाणार आहे. तर जिल्हा परिषदा, अनुदानित शाळा तसेच इतर अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या हफ्त्याची थकबाकी रक्कम सप्टेंबर महिन्यातील पगारात दिली जाणार आहे.

शासनाने ३० जानेवारी २०१९ रोजी अधिसूचना काढून  सातव्या वेतन आयोगाची थकबाकी  २०१९-२० पासून पुढील ५ वर्षांत ५ समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  तसेच निवृत्तिवेतनाच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षांत, ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याचे २४ जानेवारी २०१९ आणि १ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित केले आहे.

जे कर्मचारी (भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह) १ जून, २०२० ते या शासन आदेशांच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील, अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम रोखीने देण्यात येणार आहे. तसेच भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली दुसऱ्या हप्त्याची रक्कम १ जुलै २०२० पासून दोन वर्षे म्हणजे ३० जून २०२२ पर्यंत काढता येणार नाही.

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२१ रोजी देणे असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता स्थगित ठेवण्यात येत आहे. थकबाकीचा तिसरा हप्ता देण्यासंदर्भात स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येतील.



हेही वाचा -

दिलासादायक! घरोघरी लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार

माहुलमध्ये उभारण्यात येणार ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा