Advertisement

कामगार रुग्णालय आग: मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत


कामगार रुग्णालय आग: मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत
SHARES

अंधेरी पूर्वेकडील कामगार (ESIC) रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी ही मदत जाहीर केली आहे. या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला असून १४२ रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तसंच, २ जणांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे, तर १० जण गंभीर जखमी आहेत.


इतकी आर्थिक मदत

आगीच्या दुर्घटनेनंतर केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यी यांनी मंगळवारी दिल्लीत कामगार व इएसआयएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी या बैठकीमध्ये आगीच्या दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शक्य होईल तितकी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत, गंभीर जखमी झालेल्यांना २ लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना १ लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.


केंद्रीय मंत्र्यांचा दौरा

दरम्यान, मंगळवारी मंत्री आणि त्यांच्या बरोबर या खात्याचे सचिव आणि 'इएसआयसी' डायरेक्टर जनरल हे मदतकार्याची पाहणी करण्यासाठी कामगार रुग्णालयात येणार आहेत. तसंच, जखमींच्या मदतीसाठी 'इएसआयसी'च्या डॉक्टरांचं खास पथक मुंबईला येणार असल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे .हेही वाचा-

कामगार रुग्णालयातील आगीत ८ जणांचा मृत्यू, १४२ जण जखमीRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा