Advertisement

कामगार रुग्णालयातील आगीत ८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश


कामगार रुग्णालयातील आगीत ८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
SHARES

मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील कामगार (ESIC) रुग्णालयाला सोमवारी सायंकाळी लागलेल्या आगीत एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४२ जण जखमी झाले आहेत. यांत अग्निशमन दलाच्या ३ जवानांचाही समावेश आहे. जखमींवर उपनगरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.


आगीचं कारण अस्पष्ट

सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कामगार रूग्णालयात आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असला, तरी आगीचं मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत आटोक्यात आणली.


संख्या ८ वर

तसंच रुग्णालयात अडकलेले रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, डाॅक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना इमारतीच्या काचा फोडून दोरखंड आणि शिडीच्या साहाय्याने सुखरुपरित्या बाहेर काढलं. सोमवारी रात्रीपर्यंत आगीमुळं ६ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु, उपचारदरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ८ वर गेली आहे.


'या' रुग्णालयात उपचार

आगीची घटना घडल्यावर या रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षेच्या दृष्टीनं उपनगरांतील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये कूपर रुग्णालय, पी. ठाकरे रुग्णालय, होली स्पिरीट रुग्णालय, सेव्हन हिल्स रुग्णालय, हिरानंदानी रुग्णालय, सिद्धार्थ रुग्णालय, शताब्दी रुग्णालय अशा एकूण ७ रुग्णालयांमध्ये १७३ रुग्णांना आणि ३ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना दाखल करण्यात आलं होतं.

यापैकी २६ जणांना डिस्चार्ज मिळाला असून १४२ रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तसंच, २ जणांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून १० जण गंभीर जखमी आहेत.हेही वाचा-

Video: अंधेरीतील कामगार रुग्णालयात आग, ६ जणांचा मृत्यू, १५० जण जखमी
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा