Advertisement

Video: अंधेरीतील कामगार रुग्णालयात आग, ६ जणांचा मृत्यू, १५० जण जखमी


Video: अंधेरीतील कामगार रुग्णालयात आग, ६ जणांचा मृत्यू, १५० जण जखमी
SHARES

अंधेरीतील कामगार (ESIC) रुग्णालयात सोमवारी सायंकाळी आग लागून ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं असलं, तरी धुराचे लोट कायम अाहे. ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागल्याचं म्हटलं जात आहे. 


8.00: या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार - आरोग्यमंत्री दीपक सावंत

7.45: सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ३,  होली स्पिरिट मध्ये १, कूपर  हॉस्पिटलमध्ये २ जणांचा मृत्यू, मृतांची संख्या ६ वर , तर १५० जण जखमी

6.48 : जखमींची संख्या १०८ वर जखमींपैकी १५ जणांना कूपर रुग्णालयात, २३ जखमींना ट्राॅमा रुग्णालयात, ४० जखमींना होली स्पीरिट रुग्णालयात आणि ३० जखमींना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे.

6.40 : कूपर रुग्णालयात आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढून २ वर

6.15 : दोन महिलांनी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन मारली होती उडी, त्यापैकी एकीचा मृत्यू, जखमींचा आकडा वाढून ५० वर गेला

6.12 : मृत व्यक्तीने भीतीमुळे रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याने त्याचा मृत्यू

6.10 : रुणालयाजवळ पोहोचणारा एक किमी अंतराचा रस्ता रुग्णवाहिनी आणि मदतकार्यासाठी येणारी वाहनं सोडून इतर वाहनांसाठी बंद, यामुळे परिसरात प्रचंड वाहतूककोंडी

6.00 : ४७ जणांची सुखरुप सुटका, कूपर रुग्णालयात १०, ट्राॅमा रुग्णालयात ७, सेव्हन हिल्स रुग्णालयात १५ आणि होली स्पिरिट रुग्णालयात १५ जण दाखल

5.51 : अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी, २८ जण जखमी 

5.45 : बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाल्याची माहिती 

5.40 : जखमींना कूपर, ट्राॅमा केअर आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारांसाठी रवाना करण्यात येत आहे.

5.30 : रुग्णालयात ५० जण अडकल्याची भीती



कुठे लागली आग?

अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी मरोळ येथील ५ मजली कामगार रुणालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचा काॅल येताच अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरीत घटनास्थळी रवाना झाल्या. ही आग ४ वाजून ०३ मिनिटांनी लागली. ही आग लेव्हल ३ ची आग आहे. आग आॅपरेशन थिएटरजवळ शाॅर्टसर्किटमुळे लागल्याचं समजत आहे. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी शिडीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू केलं आहे.


एकाचा मृत्यू

आगीमुळे रुग्णालयात धुराचे लोळ पसरले आहेत. यांत अनेक रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक, डाॅक्टर आणि कर्मचारी अडकले असून त्यांना खिडकीद्वारे काढण्यात येत आहे. बचावकार्यादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू, तर काहीजण जखमी झाल्याचंही समजत आहे. जखमींना पुढील उपचारांसाठी कूपर रुग्णालयात नेण्यात येत आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा