Advertisement

ज्येष्ठ नागरिक म्हणून वयाची अट लवकरच ६० वर्ष


ज्येष्ठ नागरिक म्हणून वयाची अट लवकरच ६० वर्ष
SHARES

ज्येष्ठ नागरिक म्हणून वयाची अट ६५ वरून ६० करण्याबाबतचा निर्णय येत्या दोन महिन्याच्या आत घेण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.


विधान परिषदेत दिली माहिती

विधान परिषदेत सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा आणि इतर समस्यांविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना दिलीप कांबळे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी महानगरपालिका क्षेत्रात ज्या जागा ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी आरक्षित ठेवल्या आहेत, त्या तशाच ठेवण्याबाबत तसेच या जागा वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असं सांगितलं.


मदतनीसांकडून गुन्हा घडल्यास

मातोश्री वृद्धाश्रम योजनेंतर्गत ज्या संस्थांचे अनुदान बंद झाले, त्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने कोल्हापूरच्या धर्तीवर आजारी ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतनीस देणाऱ्या संस्थेने अशा मदतदारांची पूर्ण चौकशी करूनच त्यांना पाठवावे, असं संबंधीत संस्थेला निर्देश देण्यात येतील, असं न केल्यास आणि मदतनीसांकडून काही गुन्हा घडल्यास संबंधीत संस्थेला सहआरोपी करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा