मालाडमधला 'तो' पुतळा अखेर खुला

 Malad
मालाडमधला 'तो' पुतळा अखेर खुला
मालाडमधला 'तो' पुतळा अखेर खुला
See all

मालाड - तीन वर्षांपासून झाकलेला मालाड पश्चिमेकडील नेव्हीनगर स्थित मानवी प्रतिकात्मक पुतळा अखेर खुला करण्यात आला आहे. एक मानव हातोडीने शिल्प कोरतो आहे, असा हा पुतळा आहे. 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हा सदगुरु वामनराव पै यांचा संदेश या पुतळ्याच्या माध्यमातून देण्यात आलाय. हा पुतळा आहे, त्या चौकाला सद्गुरु वामनराव पै चौक असं नाव देण्यात आलंय. 3 वर्षांपासून झाकून ठेवलेल्या या पुतळयाचं वृत्त मुंबई लाईव्हनं दिलं होतं. त्याची दखल घेत स्थानिक नगरसेवक दीपक पवार यांनी पुतळयाचं काम पूर्ण केलं असून, हा पुतळा खुलाही केला आहे. मालाडकरांनीही याबद्दल समाधान व्यक्त केलंय.

Loading Comments