Advertisement

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनाला स्टिकर्स, वाहतूक पोलिसांची मोहीम

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफी केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनाला स्टिकर्स, वाहतूक पोलिसांची मोहीम
SHARES

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफी केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. तरीही टोल नाक्यावर टोल वसूल केला जात असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. यावर शिंदे सरकारनं तातडीनं पाऊल उचलली आहेत.

वारकऱ्यांच्या वाहनाला वाहतूक पोलिसामार्फत स्टिकर्स लावले जात आहेत. या स्टिकर्सवर वारकऱ्यांच्या प्रवासाचा पूर्ण तपशील असेल. तसेच पंढरपूरला जाताना आणि परत येणातानेच टोल माफ होणार आहेत.

यासंदर्भात बुलढाणा आमदार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. पण त्यानंतर मला टोलवसुली अद्याप सुरू असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मी टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांना आवाहन करतो की वारकऱ्यांना त्रास न होता त्यांची वाहने जाऊ द्यावीत. अन्यथा कारवाई करण्यात येईल.

आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करुन पालख्या 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत. तर 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. आता सर्व पालख्या पंढरपूरच्या जवळपास पोहोचल्या आहेत. अनेक वारकरी थेट एकादशीदिवशी पंढरपुरात पोहोचतात.



हेही वाचा

Ganpati 2022: कोकण रेल्वे मार्गावर धावणार अतिरिक्त 32 स्पेशल गाड्या

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा