कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकली जखमी

 Parel
कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकली जखमी

परळ - अंबरनाथ येथील बालाजीनगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी दोन चिमुकल्यांवर रविवारी हल्ला केला. त्यातील गंभीर जखमी मुलीला परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खुशी पापुल ही पाच वर्षांची मुलगी घरापासून काही अंतरावर खेळत असताना एका भटक्या कुत्र्याने खुशी आणि तिच्या सोबत असणाऱ्या एका मुलावर सकाळी हल्ला केला.घाबरलेल्या खुशीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या आधीच तिला तीन ठिकाणी या कुत्र्याने चावा घेतला. यात खुशीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालेली असून डोक्यावर आणि पाठीवर अनेक ठिकाणी कुत्र्यांनी चावे देखील घेतले आहेत. कुत्र्याच्या हल्ल्यात खुशीचा डोळा थोडक्यात बचावला आहे. पालिकेच्या छाया रुग्णालयातील डॉक्टरांनी तीच्यावर प्राथमिक उपचार करून तत्काळ मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. या हल्ल्यात भेदरलेल्या खुशीला रक्ताच्या उलट्या झाल्याने तिला त्वरित मुंबई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी 108 ची रुग्णवाहिका सेवा मागविण्यात अली होती. मात्र ही रुग्णवाहिका केवळ ठाण्याला सोडणार असल्याने मोठा वाद विवाद निर्माण झाला. त्यामुळे तब्बल तासभर जखमी अवस्थेत खुशी तशीच होती.

Loading Comments