Advertisement

महाराष्ट्रात कडक संचारबंदी सुरू! वाचा नेमके काय आहेत नियम?

बुधवार १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून संचारबंदीला सुरूवात झाली असून १ मे च्या सकाळी ७ पर्यंत राज्यात संचारबंदी राहणार आहे. यादरम्यान कलम १४४ लागू असेल.

महाराष्ट्रात कडक संचारबंदी सुरू! वाचा नेमके काय आहेत नियम?
SHARES

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १५ दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहेत. त्यानुसार बुधवार १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून संचारबंदीला सुरूवात झाली असून १ मे च्या सकाळी ७ पर्यंत राज्यात संचारबंदी राहणार आहे. यादरम्यान कलम १४४ लागू असेल.

त्याअंतर्गत काय सुरू राहील व काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे. ती खालीलप्रमाणे….

अशी आहे ‘ब्रेक द चेन’ची नवी नियमावली:-

  • १.  कलम १४४ आणि रात्रीची संचारबंदी
  • ए. राज्यभर कलम १४४ लागू होणार
  • बी. खाली दिलेल्या कारणांव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही
  • सी. सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणं, उपक्रम, सेवा बंद राहतील
  • डी. जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार हे यातून वगळण्यात आले आहेत.
  • ई. अपवादश्रेणीत असलेल्या सेवा आणि व्यवहार सकाळी सात ते रात्री ८ या वेळेत कार्यालयीन दिवसांसाठी वगळण्यात आल्या आहेत.
  • एफ. मोलकरणी, घरगुती कामगार, वाहन चालक, वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा अपवादश्रेणीत घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक स्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहेत.

२.  जीवनावश्यक श्रेणीत या बाबींचा समावेश आहे

१.  रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात उत्पादन आणि वितरणसंबंधी आस्थापना असतील म्हणजे वितरक, वाहतूकदार, पुरवठा साखळीतले लोक. लसींचे उत्पादन आणि वितरण, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे, इतर पूरक उत्पादने आणि सेवा.

२.  पाळीव प्राण्यांसाठीची खाद्यादुकाने, प्राण्यांसंबंधी सेवा, प्राण्यांचे निवारागृह आदी. ३.  किराणा सामानाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरीज, बेकऱ्या, सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने ४.  शीतगृहे आणि वखार सेवाविषयक आस्थापना ५.  सार्वजनिक वाहतूक – हवाई सेवा, रेल्वेसेवा, टँक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसगाड्या. ६.  विविध राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन आणि अनुषंगिक सेवा ७.  स्थानिक प्रशासनांच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती कामे

८.  स्थानिक प्रशासनाची सर्व सार्वजनिक कामे ९.  ऱिझर्व्ह बँक आणि त्यांनी आवश्यक ठरवलेली सर्व कामे १०. सेबीने मान्यताप्राप्त ठरवलेली सर्व कामे ज्यात स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिटरी, क्लिअरिंग संबंधीची कामे अशी कामे ११. दूरसंचार सेवांशी संबंधित सेवा, देखभाल दुरुस्ती १२.  मालवाहतूक १३. पाणीपुरवठा विषयक सर्व कामे, सेवा १४.  शेतीशी संबंधित सर्व कामे आणि शेती निरंतरपणे होऊ शकेल यासाठीची सर्व कामे. य़ात बी-बियाणे, खते, उपकरणे आणि दुरुस्ती हे सर्व समाविष्ट आहे. १५.  आयात-निर्यात विषयक सर्व व्यवहार

१६.  जीवनावश्यक वस्तूविषयक ई-कॉमर्स १७.  अधिस्वीकृतीप्राप्त माध्यमकर्मी १८. पेट्रोल पंप आणि पेट्रोलसंबंधी उत्पादने, सुदूर समुद्रात वा किनारपट्टीवरील उत्पादने १९.  सर्व प्रकारच्या कार्गो सेवा २०.  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या क्लाऊडसेवा, डेटा सेंटर्स आणि पायाभूत सुविधांसाठीच्या महत्त्वाच्या माहिती-तंत्रज्ञानविषयक सेवा २१.  सरकारी आणि खासगी सुरक्षारक्षक सेवा २२. विद्युत तसेच गँसपुरवठा सेवा २३.  एटीएम आणि तत्संबंधीच्या सेवा २४. टपालसेवा २५. बंदरे आणि तत्संबंधीच्या सेवा

२६.  लस तसेच इतर जीवरक्षक औषधे आणि औषधी उत्पादकांचे कस्टम हाऊस एजंट तसेच परवानाधारक मल्टिमोडल वाहतूकदार २७.  कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे कच्चे माल किंवा वेष्टनसामुग्री बनवणारे कारखाने २८. आगामी पावसाळ्यासाठी वैयक्तिक वा संस्थात्मक उत्पादनांमधे कार्यरत कारखाने २९. स्थानिक आपत्तीनिवारण प्राधिकरणाने जीवनावश्यक ठरवलेली कोणतीही सेवा

४.  सार्वजनिक वाहतूक – सार्वजनिक वाहतूक खालील निर्बंधांसह सुरू राहील

  • अटोरिक्षा- चालक अधिक २ प्रवासी
  • टॅक्सी (चारचाकी)- चालक अधिक ५० टक्के वाहन क्षमता
  • बस- पूर्ण प्रवासीक्षमता, उभे प्रवासी बंदी

ए. सर्व प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे. मास्क नसल्यास ५०० रुपये दंड केला जाईल.

बी. चारचाकी टॅक्सीमधे एखाद्या प्रवाश्याने मास्क न घातल्यास तो प्रवासी आणि चालकालाही ५०० रूपये दंड केला जाईल

सी. प्रत्येक खेपेनंतर वाहने सँनेटाईझ करणे आवश्यक आहे

डी. भारत सरकारच्या नियमानुसार सर्व प्रवासी वाहनांचे चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी लशीकरण करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी कोविड सुसंगत वागणुकीचे दर्शन घडवणेही गरजेचे आहे. टँक्सी आणि अटोरिक्षांसाठी चालकाने स्वतःच्या आणि प्रवास्यांच्यामधे प्लास्टिकचे आवरण घालून संरक्षक कवच निर्माण करायला हवे.

ई. १बीनुसार सार्वजनिक वाहतुकीसाठी जाणाऱ्या कर्मचार्यांचा प्रवास हे वैध कारण असेल.

एफ. बाहेरगावच्या ट्रेन्ससाठी रेल्वेप्रशासनाने उभे राहून कोणीही प्रवासी प्रवास करणार नाहीत, याची खातरजमा करावी. तसेच सर्व प्रवासी मास्क लावतील, हेही बघावे.

ब खाजगी वाहतूकखाजगी बसेस सह सर्व खाजगी वाहने फक्त आपत्कालीन स्थितीत वाहतूक करू शकतात.एखाद्या रास्त कारणासाठी ही त्यांना वाहतूक करता येईल. विनाकारण वाहतूक केल्यास १ हजार रुपयाचा दंड आकारण्यात येईल. खाजगी बसांकरीता खालील अतिरिक्त नियम लागू असतीलकेवळ बसलेल्या प्रवाशांना घेऊन जाता येईल. कोणतेही उभे प्रवाशांची वाहतूक बंदी असेल.

 रेस्टाॅरंट व बार

क उपहारगृह, बार, हॉटेलसर्व उपहारगृहे आणि बार ग्राहकांना सेवा देऊ शकणार नाही. फक्त त्या परिसरात राहणारे व हॉटेलचा अविभाज्य घटक असणाऱ्यांसाठी ही सोय उपलब्ध असेल.ब फक्त होम डिलिव्हरी सेवा पुरवण्यास परवानगी असेल. कोणत्याही उपहारगृह किंवा बार ला भेट देऊन ऑर्डर देता येणार नाही.

मनोरंजन, दुकाने, मॉल , शॉपिंग सेंटर इत्यादी सर्व सिनेमा हॉल बंद राहतील.नाट्यग्रह तथा थेटर पूर्णपणे बंद राहतील.उद्याने, व्हिडिओ गेम, पार्लर बंद राहतील. वॉटर पार्कसुद्धा बंद राहतील. क्लब, जलतरण तलाव, जिम, क्रीडा संकुले बंद रातील. चित्रपट /चित्रवाणी /मालिका /जाहिरातींसाठीच्या शूटिंग बंद असतील. आवश्यक सेवा ना देणाऱ्या सर्व दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर बंद असतील. सभा, संमेलने, धार्मिक पूजास्थाने व स्थळे. समुद्रकिनारे, उद्यान, खुली जागा सारखे सार्वजनिक ठिकाण बंद राहतील.  

अ) शाळा व महाविद्यालये बंद राहतील

आ) इयत्ता १० वी व १२ वी परीक्षांशी संबंधित बाबीपुरती सदर नियमात सूट देण्यात येत आहे. संबंधित परीक्षांच्या परीचालनाशी  संबंधित सर्व कर्मचारी यांचे लसीकरण करणे आवश्यक असेल अथवा त्यांनी ४८ तासांसाठी वैध असणारे आर टी पी सी आर / आर ए टी / सी बी एन ए ए टी  चाचणी नकारात्मक असण्याचे प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक असेल.

क) विवाह समारंभ कमाल केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत साजरे करण्यास परवानगी असेल .

ड) अंत्यविधीस कमाल २० लोकांना उपस्थित राहता येईल.

ई-कॉमर्स ना फक्त अत्यावश्यक वस्तू आणि सेवा यांचे वितरण करण्याची परवानगी आहे.

(strict curfew and lockdown starts in maharashtra for next 15 days)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा