अजोय मेहतांकडून विद्यार्थ्यांच्या पत्राची दखल

 Mazagaon
अजोय मेहतांकडून विद्यार्थ्यांच्या पत्राची दखल

भायखळा - भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आणण्यात आलेले हम्बोल्ट पेंग्विन पक्ष्यांना परत पाठवा, अशी मागणी शालेय विद्यार्थ्यांनी केलीय. हे अंटार्क्टिकामधील अतिथंड प्रदेशातील पेंग्विन पक्षी आहेत. मुंबईसारख्या समशीतोष्ण प्रदेशाशी हे पेंग्विन पक्षी जुळवून घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना परत पाठवावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केलीय. देवांगी सेठ, शरण्या शुभ्रांशू, आदित्य व्यास या शालेय विद्यार्थ्यांनी अजोय मेहता यांना पत्र लिहून ही मागणी केलीय.

या पत्राची अजोय मेहता यांनी तातडीनं दखल घेतलीय. अंटार्क्टिकामधील अतिथंड प्रदेशातील पेंग्विन आणि हम्बोल्ट पेंग्विन यातील फरक विद्यार्थ्यांना समजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना समजावण्यात आले. देवांगी सेठ ही कांदिवलीच्या आशानगर चिल्ड्रन्स अॅकेडमीत चौथ्या इयत्तेत शिकते. तर शरण्या शुभ्रांशू सांताक्रुझच्या पोद्दार स्कूलमध्ये पाचव्या इयत्तेत तर आदित्य व्यास मालाडच्या व्हीबयोर शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकते.

 

Loading Comments