Advertisement

सुप्रीम कोर्टाचा निर्णय: इच्छा मरणाला सशर्त परवानगी

सन्मानाने जगणं जसा मूलभूत अधिकार आहे, तसाच अधिकार मृत्यूबाबतही आहे, असं कोर्टाने नमूद केलं. या अधिकाराचा गैरवापर होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय: इच्छा मरणाला सशर्त परवानगी
SHARES

इच्छा मरणाच्या याचिकेवर मोठा निर्णय देत सुप्रीम कोर्टाने इच्छा मरणाला सशर्त परवानगी दिली आहे.

सन्मानाने जगणं जसा मूलभूत अधिकार आहे, तसाच अधिकार मृत्यूबाबतही आहे, असं कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना नमूद केलं. या अधिकाराचा गैरवापर होऊ नये यासाठी कोर्टाने मार्गदर्शक तत्त्वं देखील जारी केली आहेत.

अंथरुणाला खिळलेले अर्थात जे मरणासन्न आहेत, अशा व्यक्तींना त्यांच्या इच्छेविरुद्ध व्हेंटिलेटरवर ठेवू नये. जर त्यांनी इच्छा मरणाची मागणी केली, तर तत्कालिन परिस्थिती पाहून त्याबाबत निर्णय होऊ शकतो, हे कोर्टाने दिलेल्या निकालावरुन स्पष्ट होत आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. के. सिकरी, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा