Advertisement

Video: अहमदाबाद ते मुंबई धावणार ‘तेजस एक्स्प्रेस’, बघा, आतून आहे ‘इतकी’ खास


Video: अहमदाबाद ते मुंबई धावणार ‘तेजस एक्स्प्रेस’, बघा, आतून आहे ‘इतकी’ खास
SHARES

देशातील दुसरी काॅर्पोरेट ट्रेन तेजस एक्स्प्रेसला गुरूवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर धावणार आहे. ही ट्रेन सुरू होताच चर्चेत आली ती ट्रेनमध्ये असलेल्या आलिशान सोई-सुविधांमुळे. सोशल मीडियावर #GoTejasGo हॅशटॅगही ट्रेंड करू लागला. नेमकी काय आहे खासबात या ट्रेनमध्ये चला बघूया.


केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात खासगी स्वरूपात १५० ट्रेन चालवण्यात येणार आहेत. तर ५० रेल्वे स्थानकांचा खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून विकास करण्यात येणार आहे. तेजस एक्स्प्रेस देखील याच योजनेचा हिस्सा आहे.  

तेजस एक्स्प्रेसची वैशिष्ट्ये:

  • अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी अल्ट्रा माॅडर्न प्रायव्हेट ट्रेन
  • ट्रेनचा वेग १६० किलोमीटर प्रति तास 
  • ट्रेनमधील प्रत्येक सीटच्या मागे स्वतंत्र एलईडी स्क्रीन
  • ट्रेनमध्ये वायफायची सुविधा देखील असेल 
  • या ट्रेनमधील खाद्यपदार्थ आणि पर्यटनाची व्यवस्था आयआरसीटीसीद्वारे नियंत्रीत
  • ट्रेनच्या तिकीटांचं आरक्षण फक्त आॅनलाइनद्वारे होणार
  • ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावेल, तर गुरूवारी मेंटेनन्स करण्यात येईल
  • ५ हून अधिक वयाच्या मुलांचं पूर्ण तिकीट लागेल, त्यांनाही वेगळी सीट देण्यात येईल
  • या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला २५ लाख रुपयांचा विमा मोफत मिळेल
  • ही ट्रेन १ तासापेक्षा जास्त उशीराने आल्यास आयआरसीटीसी प्रत्येक प्रवाशाला १०० रुपये नुकसान भरपाई देईल
  • तर ट्रेन २ तासांहून जास्त काळ उशीराने आल्यास प्रवाशांना प्रत्येकी २५० रुपये मिळतील
  • या ट्रेनमध्ये परदेशी पर्यटकांसाठी १८ सीट आरक्षित असतील

‘या’ स्थानकांवर थांबेल

ही ट्रेन अहमदाबादमधून सकाळी ६.४० वाजता सुटेल आणि दुपारी १.१० वाजता मुंबईत पोहोचेल. ही ट्रेन नाडियाड, वडोदरा, भरूच, सूरत, वापी आणि बोरीवली स्थानकांवर थांबेल.

‘एवढं’ असेल भाडं

अमदाबाद ते मुंबई दरम्यान एक्झिक्युटीव्ह चेयर कारचं तिकीट २३८४ रुपये असेल. यामध्ये बेस फेयर १८७५ रुपये, जीएसटी ९४ रुपये आणि केटरिंग चार्ज ४१५ रुपये असेल. तर एसी चेयर कारचं तिकीट १२८९ रुपये असेल. ज्यात बेस फेयर ८७० रुपये, जीएसटी ४४ रुपये आणि केटरिंग चार्ज ३७५ रुपये असेल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा