Advertisement

मुंबईच्या तापमानात वाढ; नागरिकांच्या त्रासात भर

गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी सांताक्रुझमध्ये पारा ३८ अंशांच्या पुढे गेला आहे.

मुंबईच्या तापमानात वाढ; नागरिकांच्या त्रासात भर
SHARES

मुंबईतील नागरिकांना तापमान उकाड्यानं हैराण झाले आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह आता मुंबईत उष्णतेची लाट आली आहे. गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी सांताक्रुझमध्ये पारा ३८ अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळं कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ही तापमानवाढ साधारण आठवडाभर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावर व्यक्त करण्यात आला आहे.

गुरुवारी सांताक्रुझमध्ये सरासरीपेक्षा ६ अंशांनी अधिक म्हणजेच ३८.७ अंश इतक्या विक्रमी कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबई शहर व उपनगरात अचानक तापमानवाढ झाली आहे. मागील २ दिवसांपासून सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा पारा ३९ अंशांवर गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी गारांसह पाऊसही पडला. मात्र याचवेळी अनेक भागांना उकाड्यानं हैराण केलं आहे. मुंबईत उष्णतेची लाट वाढली आहे.

मुंबईतील तापमान

  • बोरिवली - ३८.४ अंश
  • चेंबूर - ३८.७ अंश
  • कुलाबा - ३६.४ अंश
  • मुलुंड - ३६.९ अंश
  • पवई - ३५.८ अंश

मुंबई शहर व उपनगरात पुढील ३ दिवस तापमान ३९ अंशांवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर ३८ आणि ३७ अंशांची नोंद होईल. समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे मतलई वारे उशिराने वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबई व आसपासच्या परिसरातील उष्णतेत वाढ झाली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणपट्ट्यात पुढील साधारण ५ ते ६ दिवस उष्णतेची लाट असेल. त्यामुळं नागरिकांनी उन्हात घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घ्यावी, असा खबरदारीचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत देण्यात आला आहे.

नागरिकांनी भर दुपारच्या सुमारास कामाशिवाय घराबाहेर टाळावे. उन्हातून गॉगल लावा तसेच टोपी घाला किंवा छत्री घेऊनच बाहेर पडा. कडाक्याच्या उन्हात फिरताना चक्कर येऊ शकते. त्यामुळे सोबत पाण्याची बाटलीही ठेवा. अधूनमधून पाणी पित राहा. अन्यथा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो, असा खबरदारीचा इशारा हवामातज्ज्ञ आणि डॉक्टरांनी दिला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा