Advertisement

समृद्धी महामार्गावर 16 फूड मॉल उभारण्यात येणार

समृद्धी महामार्गावर एवढा लांब प्रवास करताना रस्त्यालगच्या सोयी सुविधा नसल्यामुळे अपघात होत असल्याचा अनेकजणांचा आरोप होता.

समृद्धी महामार्गावर 16 फूड मॉल उभारण्यात येणार
SHARES

राज्य सरकारने समृद्धी महामार्गावरील अपघात कमी व्हावेत, त्यासाठी पाऊल उचलले आहे. समृद्धी महामार्गावर थांबा घेण्यासाठी ठिकाण नसल्यामुळे अपघात होत असल्याचा सूर होता. यावर आता सरकारने समृद्धी महामार्गावर रस्त्यालगत फूड मॉल उभारण्यासाठी टेंडर काढले आहे. 

समृद्धीवर महामार्गाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आला. मात्र हा महामार्ग अपघातांच्या मालिकेने चर्चेत आला आहे.

इंधन संपल्यानंतर वाहने रस्त्याच्या कडेवर उभी राहिल्याने किंवा चालत्या गाडीत इंधन संपल्यानंतर गाडी बंद झाल्याने ही अपघात झाल्याचे परिवहन विभागाच्या तपासणीत समोर आले आहे.

समृद्धी महामार्गावर एवढा लांब प्रवास करताना रस्त्यालगच्या सोयी सुविधा नसल्यामुळे अपघात होत असल्याचा अनेकजणांचा आरोप होता. याआधीही यासंदर्भात टेंडर काढण्यात आलं होतं, त्यानंतर तीन वेळा या टेंडरला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या मुदतवाढीतही एकच कंपनी सहभागी झाल्यामुळे हे टेंडर नाकारल्याचं एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने माहिती दिली होती. राज्य सरकारकडून  पुन्हा एकदा टेंडर काढण्यात आले आहे. 

संपूर्ण समृद्धी महामार्गावर रस्त्यालगत हे फूड मॉल ( वे-साईड सुविधा) 16 ठिकाणी असणार आहेत. नागपूरच्या दिशेने जाताना आठ ठिकाणी आणि मुंबईच्या दिशेने येताना आठ ठिकाणी असे एकूण 16 फुडमॉल असणार आहेत. याबाबतचे टेंडर सरकारकडून काढण्यात आलेय.

प्रत्येक फुड मॉलची अंदाजीत रक्कम ५० कोटी रुपये इतकी ठरवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा टेंडर काढल्यानंतर आता किती कंपन्या सहभागी होतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र सरकारने समृद्धी महामार्ग ज्या गतीने पूर्ण केला त्याच गतीने सोयी सुविधा का उपलब्ध होत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 



हेही वाचा

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात, २५ प्रवासी जागीच ठार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा