Advertisement

खेळताना विहिरीत पडलेल्या 'त्या' मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

ठाणे येथील नळपाडा परिसरात राहणारा एक १० वर्षीय मुलगा विहीरीत पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

खेळताना विहिरीत पडलेल्या 'त्या' मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
SHARES

ठाणे येथील नळपाडा परिसरात राहणारा एक १० वर्षीय मुलगा विहीरीत पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. साहील जयस्वाल असं या मुलाच नाव असून, हा परिसरात खेळत असताना लहान विहिरीत पडला. मंगळवारी ही घटना घडल्याचं समजतं. याप्रकरणी माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून या मुलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते.

अखेर २ तासाच्या अथक प्रयत्नानंतर बचाव पथकाला या मुलाला बाहेर काढण्यात यश आले. नळपाडा परिसरात असलेल्या अष्टविनायक मैदानाजवळ सायंकाळी साहिल खेळत होता. खेळत असताना तो ३५ फुट खोल असलेल्या लहान विहिरीत तोल जाऊन पडला. याची माहिती मिळताच, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्याचे शोधकार्य सुरु केले.

अखेर २ तासाच्या अवधीनंतर साहिलला बाहेर काढण्यात पथकाला यश आले असून त्याला उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान या मुलाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा