Advertisement

ई-चलान न भरल्यास ठाणे वाहतूक पोलिस वाहन जप्त करणार

ई-चालान न भरणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त करण्याचे निर्देश पोलिस उपायुक्त (ठाणे वाहतूक) बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत.

ई-चलान न भरल्यास ठाणे वाहतूक पोलिस वाहन जप्त करणार
SHARES

ई-चालान न भरणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त करण्याचे निर्देश पोलिस उपायुक्त (ठाणे वाहतूक) बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत.

परिणामी, ३० नोव्हेंबरपर्यंत ई-चालान न भरल्यास वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पुढील महिन्यात वाहतूक पोलिसांच्या तावडीत असतील. शिवाय त्यासाठी विशेष ड्राइव्ह देखील राबवलं जाणार आहे. या व्यतिरिक्त, अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे की, दंड www.MAtratra.gov.in या वेबसाइटवर किंवा महाराष्ट्र ट्रॅफिक अ‍ॅपवर भरता येतो. पेटीएमद्वारेही पैसे भरता येतात.

२०१९ मध्ये ठाणे वाहतूक पोलिसांनी कागदोपत्री पावती मिळावी म्हणून ई-चालान सिस्टीम सुरू केली. पुढील वाहनधारकांना दंड देण्याच्या बाबतीत पारदर्शकता आणली. मागील वर्षी ६ लाख ३० हजार २३२ ई-चालान जारी करण्यात आले. यातून २१ दशलक्ष इतका दंड वसूल करण्यात आला. तर यंदा जानेवारी ते ऑक्टोबर अखेरपर्यंत ५ लाख ५२ हजार ४५३ ई-चालानमुळे एकूण २२ कोटींचा दंड वसूल करण्यात आला.

दुसरीकडे, यापूर्वी मुंबईच्या परिवहन विभागानं शहरातील १ हजार ८८२ वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली आहे. काळ्या काचा असलेल्या वाहनांवर विशेष मोहीम राबवली होती. आता हा कायदा अस्तित्वात आला आहे, म्हणून सर्वोच्च न्यायालयानं नवीन सूचना केल्या आहेत. ज्यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईला अधिक चालना मिळाली आहे.

शहरातील अनेक वाहनधारकांनी काळ्या रंगाची काच लावल्या आहेत.  ट्रॅफिक पोलिसांनी अशा वाहन मालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार वाहनांवर कुठल्याही प्रकारची काळी काच लावणं हा गुन्हा आहे.हेही वाचा

मुंबई-दिल्ली रेल्वेसेवा थांबणार नाही; रेल्वेचं स्पष्टीकरण

टोलच्या दरात सरासरी १० टक्के वाढ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा