वन वे लेन असतानाही वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने वाहने चालवतात. अशा वाहनचालकांना आळा घालण्यासाठी ठाणे (thane) रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी 'टायर किलर'चा (tire killer) प्रयोग करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून येत्या काही दिवसात हे टायर किलर बसविण्यात येणार आहे. यामुळे कोणी विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास त्या वाहनाच्या चाकाचे नुकसान होणार आहे. चाकाचे नुकसान होऊ नये म्हणून चालक स्वत: विरुद्ध दिशेने गाडी चालवणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.
हा प्रयोग यशस्वी झाल्यास ठाणे शहरातील इतर भागातही टायर किलर बसवण्यात येणार आहेत. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात हजारो वाहने ये-जा करतात. रिक्षा आणि दुचाकींची संख्या जास्त आहे. स्टेशन परिसरात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी काही भागात वाहतूक पोलिसांनी वन वे मार्ग काढला आहे.
मात्र, या मार्गांवर वाहतूक पोलिस नसतील तर काही वाहनचालक विशेषत: रिक्षाचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवून या मार्गांवर प्रवेश करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. विरुद्ध दिशेने गाडी चालवल्याने गंभीर अपघात होऊ शकतो.
ठाणे महापालिका (thane municiple corporation) आयुक्त सौरभ राव यांनी सप्टेंबरमध्ये शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ठाण्यात विरुद्ध दिशेने वाहने चालवल्यामुळे होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर 'टायर किलर' बसवण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार टीएमसी आणि वाहतूक पोलिसांनी (police) काही भाग निश्चित करण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार ठाणे स्टेशन परिसरातील शिवाजी महाराज रस्त्यापासून गावदेवी मंदिराकडे आणि गावदेवी मैदानाजवळील वाहतूक मार्गावर वन वे निश्चित करण्यात आल्या आहेत.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात चाचणी झाल्यानंतर शहरातील अन्य वन वे वरही हे टायर किलर बसविण्यात येणार आहेत. 100 ते 200 मीटर आधी टायर किलरबाबत माहिती फलक लावण्यात येत आहे.
या भागात रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था केली जाईल. तसेच हा टायर किलर सीसीटीव्ही कॅमेरा परिसरात येत असल्याची खात्री केल्यानंतरच हा टायर किलर बसवण्यात आला.
वाहन योग्य दिशेने आल्यास हे काटे खाली जातात. मात्र विरुद्ध दिशेकडून एखादे वाहन आल्यास लोखंडी सळईमुळे चाकाचे नुकसान होऊ शकते.
त्यानुसार ठाणे स्टेशन परिसरातील सुभाष पथ परिसर, गावदेवी मंदिर परिसर आणि बी-केबिन परिसरात टायर किलर ठेवण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहेत.
हेही वाचा