वडाळा घाटकोपर-कासारवडवली मेट्रो मार्गाचे सुरू असलेल्या बांधकामामुळे घोडबंदर रोडवर ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेने अवजड वाहनांना बंदी घातली आहे.
18 जुलैपर्यंत रात्री 11.55 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ही बंदी असेल. पोलिस उपायुक्त (वाहतूक) डॉ. विनय कुमार राठोड म्हणाले, “हजारो अवजड वाहने गुजरातमधून घोडबंदरमार्गे उरण-जेएनपीटीकडे जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून घोडबंदर मार्गावर वडाळा-घाटकोपर कासारवडवली या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे.
" काम सुरू असल्याने एक भाग म्हणून मानपाडा ते कापूरबावडीपर्यंत बीम उभारण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या काळात होणारे अपघात टाळण्यासाठी ठाणे वाहतूक नियंत्रण शाखा या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालणार आहे."
अवजड वाहने वळवली
जड वाहने कापूरबावडी येथून कशेळी, काल्हेर, अंजूरफाटा या भागातून भिवंडीत वळवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा