अंबरनाथमध्ये (Ambarnath) लोकलमधून (Local Train) पडून महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आलेय. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी होती. घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची लोकलमध्ये गर्दी होती. त्यामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकात खाली उतरली, पुन्हा लोकलमध्ये चढली. पण आतमध्ये जाता आलेच नाही. लोकलच्या दारात उभी असताना हात सुटला अन् खाली पडली. त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अंबरनाथ आणि बदलापूर (Badlapur) रेल्वे स्थानकांदरम्यान मंगळवारी रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली. ऋतुजा गणेश जंगम असं या महिलेचे नाव असून ती कर्जतला राहणारी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. ऋतुजा ही ठाण्याला एका खासगी ट्रॅव्हल कंपनीत कामाला होती.
ठाण्याहून (Thane) कर्जत ट्रेनने (Karjat Local) परतताना अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्दीच्या रेट्यामुळे ती खाली उतरून पुन्हा ट्रेनमध्ये चढली, पण यावेळी तिला गर्दीमुळे आत जाताच आलं नाही आणि ती दारात उभी राहिली.
अंबरनाथ स्थानकातून ट्रेन सुटताच अवघ्या काही अंतरावर गर्दीमुळे तिचा हात सुटून ती खाली पडली. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात आणलं. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.याप्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत. गर्दी असताना लोकलमधून प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून कऱण्यात आलेय.
हेही वाचा