Advertisement

ठाणे : बुधवारी 'या' भागातील पाणीपुरवठा खंडित

पुढील एक ते दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

ठाणे : बुधवारी 'या' भागातील पाणीपुरवठा खंडित
SHARES
एम स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे (thane) महानगरपालिकेचा (thane municiple corporation) दैनंदिन देखभालीच्या कामासाठी बुधवार, 28 ऑगस्टपासून सकाळी 9.00 ते गुरुवारी सकाळी 9.00 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद (water cut) करण्यात येणार आहे. 

मात्र, ठाणे शहराचा टप्याटप्याने पाणीपुरवठा (water supply) सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे घोडबंदर रोड, पवारनगर, आझाद नगर, डोंगरीपाडा, वाघबील, कासारवडवली, विजयनगरी, विजय पार्क, राम मंदिर रोड, मानपाडा, टिकुजिनीवाडी, हिरानंदानी इस्टेट, ढोकळी, यशस्वी नगर, मनोरमानगर, माजिवडा, कापूरबावडा या गावांना पाणीपुरवठा होत आहे.

उन्नती, सुरकुरपाडा, जयभवानी नगर, मुंब्रा, रेतीबंदर आदी भागात बुधवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

समतानगर, रितू पार्क, सिद्धेश्वर, आकृती, दोस्ती, विवियाना मॉल, वर्तकनगर, रुस्तमजी, नेहरुनगर आदी भागांना पाणीपुरवठा होणार आहे. किसन नगर-2, जॉन्सन, जेल, साकेत आदी ठिकाणी बुधवारी रात्री 9.00 ते गुरुवारी सकाळी 9.00 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने बंद राहणार आहे.

सदर शटडाऊनमुळे पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याची योग्य साठवणूक करून ठाणे महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.



हेही वाचा

राज्यातील सर्व शाळेत सीसीटीव्हीप्रमाणे पॅनिक बटण बसवण्यात येणार

GSB सेवा मंडळाने काढला 400 कोटीचा विमा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा