Advertisement

देशातील पहिली सलग 15 डब्यांची लोकल मुंबईमध्ये दाखल

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात लवकरच ही पहिली 15 डब्यांची लोकल येणार आहे. ही 15 डब्यांची EMU रेक पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे.

देशातील पहिली सलग 15 डब्यांची लोकल मुंबईमध्ये दाखल
SHARES

मुंबई लोकलमधील (mumbai local) वाढती गर्दी लक्षात घेता, 15 डब्यांच्या लोकलची मागणी वाढते आहे. सध्या मध्य रेल्वेवर (central railway) काही 15 डब्यांच्या लोकल आहेत.

परंतु 12 डब्यांच्या लोकल ट्रेनला पुढे तीन डबे जोडून या लोकल तयार केल्या जात असे. यामुळे डब्यांची संख्या जरी वाढत असली तरी जागेची कमतरता होत होती.

आता मुंबईसाठी (mumbai) पहिल्यांदाच सलग 15 डब्यांची लोकल तयार केली गेली आहे. या ट्रेनमध्ये साध्या लोकलपेक्षा अधिक जागा असून एकाच वेळी डब्यात 7555 प्रवासी प्रवास करू शकतात.

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात लवकरच ही पहिली 15 डब्यांची लोकल येणार आहे. ही 15 डब्यांची EMU रेक पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे.

चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीने (ICF) तयार केली आहे. ही लोकल 18 फेब्रुवारीला चेन्नईवरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. लवकरच पश्चिम रेल्वे मार्गावर फेऱ्या सुरु करण्याचं उद्दिष्ट आहे.

यानंतर हळू-हळू नव्या 12 नॉन एसी लोकल मुंबईत सुरु करण्यात येणार आहेत. फेब्रुवारीअखेरिस दुसरी लोकल दाखल होण्याची शक्यता आहे.

भारतीय बनावटीची अशीही देशातील सर्वात पहिलीच लोकल ट्रेन आहे. मुंबईमध्ये सर्वप्रथम ही लोकल धावणार आहे.

पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेवर ही या लोकल ट्रेन धावतील. त्यामुळे सीएसएमटी-कल्याण, विरार-डहाणूसह कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या मार्गांवर सर्वाधिक गर्दी होते. या 15 डब्यांच्या लोकलमुळे ट्रेनची प्रवासी क्षमता वाढणार आहे.

गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. शिवाय, ICF लवकरच मुंबई उपनगरिय रेल्वेसाठी दोन स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन-एसी लोकलसुद्धा तयार करणार आहे.

या नॉन-एसी लोकल लवकरच मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुरु करण्यात येणार आहेत.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून मुंबईसाठी नव्या 12 डब्यांच्या 238 लोकल सुरु करण्याचाही आदेश दिला आहे.

यामुळे मुंबई लोकलच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे. सध्या 15 डब्यांच्या लोकलसाठी काही स्थानकांची लांबी अपुरी पडते आहे.

त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या विलेपार्ले, सांताक्रूझ, खार रोड आणि वांद्रे स्थानकांवर फलाटांची लांब वाढवण्यात येत आहे. ही कामे पूर्ण होताच 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरु होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

होळीसाठी पश्चिम रेल्वे विशेष गाड्या चालवणार

मीरा-भाईंंदरमध्ये मालमत्ता करात मोठी वाढ

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा