Advertisement

मुंबईत फक्त महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह!

मुंबई महापालिकेकडून महिलांसाठीचं पहिलं प्रसाधन गृह मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकासमोर आणि तुळसीवाडी परिसरात उभं राहतंय. मुंबईत प्रसाधन गृहांची जास्तीत जास्त उभारणी करण्याच्या दृष्टकोनातून विशेष सर्व्हे करण्यात आला होता. हा सर्व्हे करताना महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह बांधण्यासाठी जागा निश्चित केली होती.

मुंबईत फक्त महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह!
SHARES

मुंबईतील महिलांसाठीचं स्वतंत्र असं पहिलं प्रसाधन गृह लवकरच सुरु होणार आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या समोर हे प्रसाधन गृह असून लवकरच ते महिलांसाठी खुलं करून दिलं जाणार आहे. 'महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह असावं' या मागणीसाठी महिला संघटनांनी 'राईट टू पी'अंतर्गत जोरदार मोहीम उघडली होती. या मोहिमेला अखेर यश मिळालं आहे.


२ फेब्रुवारीला होणार लोकार्पण

मुंबई महापालिकेकडून महिलांसाठीचं पहिलं प्रसाधन गृह मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकासमोर आणि तुळसीवाडी परिसरात उभं राहतंय. मुंबईत प्रसाधन गृहांची जास्तीत जास्त उभारणी करण्याच्या दृष्टकोनातून विशेष सर्व्हे करण्यात आला होता. हा सर्व्हे करताना महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह बांधण्यासाठी जागा निश्चित केली होती. त्यानुसार महापालिकेच्या डी प्रभागात हे प्रसाधन गृह उभारण्यात आलं आहे. या प्रसाधन गृहाचं काम पूर्ण झालं असून, येत्या २ फेब्रुवारीला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे. यावेळी युवा सेना अध्यक्ष व शिवसेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित असणार आहेत.

या प्रसाधनगृहात पाश्चिमात्य पद्धतीचे ८ आणि बैठ्या पद्धतीचे २ याप्रमाणे दहा शौचालय आहेत. याशिवाय बेबी चेंजिंग सेंटरचीही व्यवस्था केली आहे. याशिवाय सॅनिटरी नॅपकिन पॅड व्हेंडिंग मशिन आणि डिस्पोजल मशिनही बसवण्यात आलेलं आहे.

विश्वास मोटे, सहायक आयुक्त, डी विभाग

मुंबईत सुमारे १२०० सार्वजनिक प्रसाधन गृह आहेत. मात्र, या सर्व प्रसाधन गृहांमध्ये महिला व पुरुषांसाठी संयुक्त अशी स्वतंत्र व्यवस्था आहे. परंतु, मुंबईत फक्त महिलांसाठीच असं स्वतंत्र प्रसाधन गृह नव्हतं. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महिलांसाठीची स्वतंत्र अशी १० प्रसाधन गृह बांधण्याचा निर्धार केला. त्यातीलच हे पाहिलं असं प्रसाधनगृह आहे.



हेही वाचा

समुद्र प्रदूषित केल्याप्रकरणी हाजी अली ट्रस्टला हरित न्यायाधिकरणाचा दणका, बजावली नोटीस


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा